आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कार्याची क्रियासिद्धी इच्छाशक्तीवरच; अॅड. कालिदास थिगळेंचे प्रतिपादन

बीड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या जीवन प्रवासात ईश्वरदत्त कार्याचे प्रकृती धर्माने निर्वहन करत असताना आपल्या पुढ्यात जे काम आलेले आहे ते निष्ठेने करणे हे महत्त्वाचे असते. महान कार्याची क्रियासिद्धी ही साधनांवर नव्हे तर इच्छाशक्तीवर अवलंबून असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ कालिदास थिगळे यांनी मांडले. संस्कार प्रबोधिनीच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

याप्रसंगी संस्कार पीठावर संस्कार प्रबोधिनीचे उपाध्यक्ष नामदेवराव क्षीरसागर हे उपस्थित होते. संचालक रतिलाल भंडारी, पाठक, डॉ रेणुकादास जिंतूरकर, सतीश दंडे, प्रशांत थेटे, सुनील क्षीरसागर, दिलीप खिस्ती, डॉ अनुराग पांगरीकर, प्रसाद राजेंद्र, भाऊसाहेब बोबडे, यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी अध्यक्षीय नामदेवराव क्षीरसागर यांनी थिगळे यांच्या कार्याचा आढावा घेऊन मनोगत व्यक्त केले व एस आर कुलकर्णी यांनी सुत्रसंचलन केले. प्रज्ञा खके यांनी थिगळे यांच्या जीवन कार्यावर आधारित सुश्राव्यओवी गायन केले व मुख्याध्यापिका लीला जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.

बार कौन्सिलचा पुरस्कार मिळाल्याने संस्कार प्रबाेधिनीच्या वतीने केला सत्कार याच वेळी डॉ. अनुराग पांगरीकर यांनी समयोचित मनोगत व्यक्त करत सत्कारमूर्तींच्या निरामय दीर्घायुष्याची प्रार्थना करत त्यांचे अभीष्टचिंतन केले. प्रास्ताविक दिलीप खिस्ती यांनी केले व सत्कार सोहळ्याच्या आयोजनाची भूमिका उपस्थितांना विशद करून सांगितली.

बातम्या आणखी आहेत...