आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाशी द्यावी:श्रद्धा हत्या प्रकरणातील आरोपीस फाशी द्यावी

पाटोदा6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथील श्रद्धा वालकर या तरुणीस प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला फसवून लव जिहादच्या प्रकरणात तिची अमानुषपणे हत्या करून विषयीच्या पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी आफताब पुनावाला याला तातडीने फाशी देऊन श्रद्धा वालकर हिच्या कुटुंबीयास न्याय द्यावा अशी मागणी पाटोदा येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल विश्व हिंदू परिषद तसेच विविध हिंदू संघटना व हिंदू बांधवांच्या वतीने तहसील प्रशासनाकडे याविषयी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, श्रध्दा वालकरया मुलीस लव्ह जिहाद या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तीला फुस लावून दिल्ली येथे नेण्यात आले व तेथे तिचा खून करून शरीराचे ३५ तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या नराधमाने कसे कृत्य केले आहे त्याच्या विरूध्द तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...