आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:आरोपींना अटक करावी; माजलगावात आंदोलन; डॉ. आंबेडकर जयंतीदिनी झाली होती दगडफेक

माजलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजय साळवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते धम्मानंद साळवे यांच्या नेतृत्वाखाली माजलगावात गुरुवारी आंदोलन करण्यात आले.

माजलगाव तालुक्यातीले सोमठाणा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत हल्ला केल्याची घटना २९ एप्रिल रोजी घडली या हल्ल्यात तिघांना मार लागला होता या घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून सतत केली जात आहे.

यासाठी गुरुवारी आंदोलन केले गेले या आंदोलनामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजय साळवे, वंचित बहुजन आघाडीचे धम्मानंद साळवे, बसपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. अमोल डोंगरे, एस. एन. डोंगरे, प्रशांत बोराडे, डी.एल.भालेराव, विशाल साळवे ,अतुल भदर्गे ,वशिष्ठ लांडगे यांच्यासह सोमठाणा गावातील महिला पुरुष अन्याय पीडित ग्रामस्थ व इतर कार्यकर्ते सहभागी झाले आहेत

बातम्या आणखी आहेत...