आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन‎‎:अंबाजोगाई साहित्य संमेलन‎ 19‎ ते 21 ऑगस्टदरम्यान होणार; दर दोन वर्षांनी मसापकडून होतेय संमेलन‎‎

अंबाजोगाई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई‎ अंबाजोगाई येथील मराठवाडा साहित्य ‎परिषदेच्या शाखेच्या वतीने दर दोन वर्षांनी घेण्यात येणारे अंबाजोगाई साहित्य संमेलन‎ हे यंदा १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान होणार‎ आहे. या संमेलनात अनिवासी‎ अंबाजोगाईकर सहभागी होणार‎ असल्याची माहिती स्वागताध्यक्ष प्राचार्य ‎आय. बी. खडकभावी यांनी दिली.‎ सन १९९६ पासून अंबाजोगाईत‎ मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून‎ दर दोन वर्षांनी साहित्य संमेलन घेतले‎ जाते. आतापर्यंत ९ संमेलने झाली असून ‎यंदाचे दशकपूर्ती संमेलन आहे.

‎ ‎ अंबाजोगाईतील नागरिक महाराष्ट्रात,‎ देशात व परदेशात व्यवसाय, नोकरी, ‎पत्रकारिता, न्याय, नाट्य, ललित कला, संगीत, अभिनय, शिक्षण, विज्ञान,‎ इतिहास, सामाजिक प्रशासन आदी क्षेत्रात ‎नावलौकिक मिळवून आपली प्रगती करत ‎आहेत. अशा सर्वांचा या संमेलनात‎ सहभाग असणार आहे. या संमेलनाचे‎ स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बी. आय.‎ खडकभावी यांची यापूर्वीच निवड‎ करण्यात आली. त्यासाठी स्वागत समिती‎ स्थापन करण्यात आली आहे.‎ संमेलनाच्या अध्यक्षपदी अंबाजोगाईचे‎ सुपुत्र सुप्रसिद्ध कवी, नाटककार, गीतकार‎ प्रा. दासू वैद्य यांची निवड करण्यात आली‎ आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे‎ ते प्रमुख आहेत.‎ या संमेलनात कवी संमेलन,‎ पत्रकारिता, महिला, ललित कला आदी‎ विषयांवर परिसंवाद आयोजित केले‎ जाणार आहेत. त्याच बरोबर कथाकथन,‎ “माझ्या सवे गंध अंबाजोगाईचा” या‎ विषयावर विविध क्षेत्रातील मान्यवारांच्या‎ मुलाखती, मनोगते आयोजित केली‎ जाणार आहेत.हे संमेलन यशस्वी‎ करण्यासाठी मसापचे अध्यक्ष दगडू‎ लोमटे, माजी अध्यक्ष व मार्गदर्शक अमर‎ हबीब स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. आय.‎ खडकभावी, मसाप सचिव गोरखं शेंद्रे हे‎ पदाधिकारी प्रयत्न करत आहेत.‎ सहभागाचे आवाहन केले आहे.‎

पुरस्कारांचे वितरण‎ संमेलनाचे माजी दिवंगत अध्यक्ष प्राचार्य‎ संतोष मुळावकर शिक्षक साहित्य पूरस्कार,‎ मंदा देशमुख कथा लेखक पुरस्कार व‎ प्राचार्या शैला लोहिया लेखिका पुरस्कार‎ प्रदान केले जाणार आहेत. त्याचे स्वरूप‎ प्रत्येकी दोन हजार रुपये स्मृती चिन्ह असे‎ आहे. पुस्तक प्रदर्शने, कला प्रदर्शने,‎ सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...