आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकर्षण:बीड शहरातील पहिल्या पेन्शनर्स पार्कमध्ये पहिल्या सेल्फी पॉइंटचे आकर्षण ; लोकार्पण सोहळा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील के. एस. के. कॉलेजच्या मुख्य रस्त्यालगत मराठवाड्यातील पहिले पेन्शनर पार्क तसेच पहिला सेल्फी पॉइंट उभारण्यात आला. या भागाचे नगरसेवक विनोद मुळुक, नरसिंह नाईकवाडे यांच्या पुढाकारातून उभारलेल्या या पार्कचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. सार्वजनिक दायित्व ठेवून कामे केली तर लोकांचा विश्वास बसतो पेन्शनर पार्क हे एक आदर्श काम आहे सामुदायिक स्वरूपाची कामे पूर्ण केली जात आहेत जबाबदारी पेलण्यात आणि घेण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले तर बीड शहरात विविध विकास कामे पूर्ण करून आगामी काळात राहिलेली कामे देखील पूर्ण करणार आहोत कमी नव्हे तर काकणभर जास्तच कामे आम्ही करून दाखवली असल्याचे प्रतिपादन युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी केले आहे. पेन्शनर पार्क हे एक आदर्श काम झाले. सामुदायिक स्वरूपाची कामे पूर्ण केली जातील त्याची जबाबदारी पेलण्याची आमची तयारी आहे त्यात कमी पडणार नाहीत असे सांगून त्यांनी नागरिकांना या पार्क ची प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...