आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामातंग समाजाला सर्वांगीण विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड या प्रमाणे वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत वाटप केलेले कर्ज माफ करण्यात यावे यासह इतर मागण्यासाठी बहुजन रयत परिषदेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले. बहुजन रयत परिषदेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रदेशाध्यक्ष रमेशतात्या गालफाडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमल काळुंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर, संपर्क प्रमुख अशोक सोनवणे, जिल्हा प्रमुख गोरख मोमीन, जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश पाटुळे, जेष्ठ नेते लालासाहेब शिंदे, बाबुराव गालफाडे, सुधाकर कानडे, रवींद्र क्षीरसागर, महेश धुरंधरे, संगीता बाबरे, सुबाबाई थोरात, अशोक भाकरे, सदाशिव वैरागे, रघुनाथ थोराते, डॉ. चंद्रशेखर गवळी, योगिराज साळवे, प्रदीप उमाप, अरूण सोनवणे, जालिंदर सोनवणे, विक्रम सोनवणे, आत्माराम वाघमारे, दशरथ काळे, शेखर सोनवणे, गणेश कांबळे, पनवेल सानवणे, राधाकिसन सोनवणे, भागवत सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्या
प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे म्हणाले, शासनाने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब द्यावा, गेल्या ३० वर्षांपासून लहुजी साळवे आयोगाची स्थापना करण्यात आली. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, संगमवाडी येथील आद्य क्रांति गुरू लहुजी साळवे यांचे स्मारकाचे तत्काळ भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात यावी, या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरलो आहोत. या मागण्यांचा विचार करून शासनाने मागण्या मंजूर कराव्यात अन्यथा राज्यभर रास्ता रोको, जेलभरो अशा प्रकारची आंदोलने लोकशाही मार्गाने करू असा इशारा ही त्यांनी दिला. मागण्याचे निवेदन निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.