आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती उत्सव:महापुरुषांची जयंती जाती-धर्माची बंधने तोडून व्हावी ; भागवत दराडे यांचे प्रतिपादन

दिंद्रुड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती संगम (ता.धारुर) येथे साजरी करण्यात आली. महापुरुषांना जातीच्या बंधनात न अडकवता प्रत्येक महापुरुषांची जयंती सर्व जाती धर्माची बंधने तोडून सार्वजनिक साजरी व्हावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा सरचिटणीस भागवत दराडे यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस भागवत दराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भाजपचे बंडू खांडेकर संगमचे सरपंच भगवान कांदे, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे नवनाथ कांबळे, युवा कार्यकर्ते अविनाश गवळी, नागेश वकरे, कल्याण वाघचौरे व जी.के. फाउंडेशनचे दीपक सांगळे हे उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर मान्यवरांनी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. डीपीआयचे नवनाथ कांबळे, भागवत दराडे, दीपक सांगळे व बंडू खांडेकर यांची प्रबोधनपर भाषणे झाली. समाजासाठी योगदान देणाऱ्या युगपुरुषांना जातीच्या बंधनात अडकवून संकुचित करणे उचित नाही. महापुरुषांना जातीच्या बंधनातून मुक्त करण्याची गरज असल्याचे मत बंडू खांडेकर यांनी व्यक्त केले. महापुरुषांच्या जयंत्या सार्वजनिकरित्या गावाच्या वेशीवर साजऱ्या होणार नाहीत तोपर्यंत त्यांचे विचार जनमानसात रुजनार नाहीत. असे मत राष्ट्रवादीचे नेते भागवत दराडे यांनी व्यक्त केले. तर दीपक सांगळे यांनी महापुरुषाचे विचार प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष मंगेश काळे, अरुण काळे व इतरांनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...