आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभुमी असलेल्या तालुक्यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पाच वर्षात भगवानभक्तीगड परिसरात मंदिर व स्मारकाचा विकास झाला परंतु ज्या वाड्यात संत भगवान बाबा यांचा जन्म झाला तो पुरातन वाडा आजही दुर्लक्षित आहे. या वाड्याचा जिर्णोद्धार कधी होतो याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे पाटोदा तालुक्यातील सुपे सावरगाव हे जन्मस्थळ होय.श्रावण वद्य पाच शके १८१८ ( सोमवार २९ जुलै, इ.स. १८९६), सूर्योदयावेळी भगवानबाबांचा जन्म झाला.
त्यांच्या जन्माच्या वेळी वाड्यामध्ये १०८ दिवे लागल्याचे भाविक सांगतात. बारशाच्या वेळी मुलाचे नाव ‘आबा’ किंवा ‘आबाजी’ ठेवण्यात आले. त्यामुळे भगवानबाबांचे पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप होते. या गावात संत भगवान बाबांचे मंदिर आहे. परंतु सध्या या गावातील मुळ जन्मस्थळ असलेल्या वाड्याची पडझड झालेली आहे. वाड्याच्या समोरील बाजु व दरवाजा शिल्लक असुन बाकीच्या भिंती आणि खणाचे माळवद ढासळलेले आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथे दसरा मेळावा घेण्यास सुरूवात केल्यानंतर राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे स्मारक झाले. गावांतर्गत रस्ते पाणी इतर मूलभूत सुविधांसोबतच कुसळंब ते मुगगाव हा मार्ग झाला.
पुरातन वाड्याचा जिर्णोद्धार व्हावा राष्ट्रसंत भगवान बाबांचे आमच्या गावात मंदिर व स्मारक ही आहे. गावात येणारे भाविक दोन्ही स्थळांबरोबरच संत भगवान बाबा यांचा जन्म ज्या वाड्यात झाला त्या वाड्यात जावुन दर्शन घेतात. या वाड्याचा लवकरात लवकर जिर्णोध्दार व्हावा. -विनायक सानप, ग्रामस्थ ,सावरगाव घाट दसरा मेळाव्यामुळे राज्यात प्रसिद्ध पाटोद्यापासुन २७ किलो मीटर अंतरावर सावरगाव घाट येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीच आहे. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने हे गाव राज्यात प्रसिद्ध झाले आहे. या गाव व परिसराचा कायापालट झाला आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या सत्तेत असताना त्यांनी प्रयत्न करून निधीही मंजूर केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.