आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्काळ मंजुरी:भाजपच्या शिष्टमंडळाने वाचला असुविधांचा पाढा

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ईदगाह रोड, नाळवंडी नाका, किशोरी जिनिंगपर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामास तत्काळ मंजुरी मिळवून ते काम सुरू करावे, तर अन्य मंजूर झालेल्या सिमेंट रस्त्यांचेही काम तातडीने सुरू करण्याबराेबरच मूलभूत सुविधांसंदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची भेट घेतली. विविध मूलभूत सुविधांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडण्यात आले. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाहणी करून कामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती भाजप नेते सलीम जहांगीर यांनी दिली.

भगवानबाबा प्रतिष्ठानच्या बाजूच्या बिंदुसरा नदीजवळील स्मशानभूमीमधील घाणीचे पाणी व कचरा याची विल्हेवाट होणे आवश्यक आहे. शहरातील बंद स्ट्रीट लाइट चालू करावेत, दररोज नाल्यांच्या सफाईसह नगर रोडवरील तिन्ही सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई करावी . यासह अनेक मूलभूत नागरी असुविधांबाबत जिल्हाधिकारी शर्मा व बीड नगर परिषदेचे प्रशासक उमेश ढाकणे यांना निवेदन सादर केले. या वेळी भाजप नेते सलीम जहांगीर, देविदास नागरगोजे, स्वप्निल गलधर, भगीरथ बियाणी, डॉ. लक्ष्मण जाधव, संगीताताई धसे, अनिल चांदणे, विलास बामणे, गणेश पुजारी, सुनील मिसाळ, मुसा खान, लताताई म्हस्के, संग्राम बांगर, बालाजी पवार, दत्ता परळकर, आड्डो जहागीरदार, वीरेंद्र शेळके, अम्मो शेख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...