आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विशेष:मंडळाने दिला एकल महिलांना महाआरतीचा मान

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे गणेश मंडळ म्हटले की, शहराच्या हिरालाल चौकातील बुरूड गल्लीतील आझाद हिंद गणेश मंडळाचे नाव समोर येते. मागील ५५ वर्षांपासून या मंडळाने सामाजिक कामाची कास धरली आहे. २५ वर्षांपूर्वी स्वखर्चाने संकल्प सिद्धी गणेश मंदिर उभारत एक आदर्श निर्माण केला. यंदा या मंडळाने गणपती बाप्पाच्या महाआरतीचा मान एकल महिलांना देऊन सामाजीक बांधिलकी जपली आहे. बीड शहरातील बुरूडगल्लीत १९६७ मध्ये अाझाद हिंद गणेश मंडळाची स्थापना केली. ती दिवंगत स्वातंत्र्यसैनिक कान्होबा सुतनासे आणि सदाशीव नगरे यांनी. आज पेठ बीडचा राजा म्हणून या मंडळाच्या गणपतीची ओळख आहे. परिसरातील नागरिकांकडून गणेशोत्सवासाठी वर्गणी घेतली जात नाही. विशेष म्हणजे २०१९ मध्ये या मंडळाने बेटी बचाव बेटी पढाव या अभियानावर जनजागृती केली. सध्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून स्वप्नील विभुते, कोषाध्यक्ष म्हणून अभिजीत कानडे तर सघंटक रोहित वडतीले आहेत. कोरोना काळात मजूरांना अन्नधान्य वाटप केले.

२५ वर्षापूर्वी उभारले संकल्प सिध्दी गणेश मंदिर : अाझाद हिंद गणेश मंडळाने गणेशभक्तांसाठी खास राजस्थान येथून देखणी गणेशमूर्ती आणून २७ डिसेंबर १९९७ मध्ये गणेश मंदिर उभारले. या मंदिराला संकल्पसिद्धी गणेश मंदिर असे म्हणतात. गणपती मंदिर उभारणीसाठी येथील माजी नगरसेवक रमेश बेदरकर, अर्जुन वडतीले, राजाभाऊ कानडे, दिलीप कुलकर्णी, अशोक चिपाडे, उत्रेश्वर कानडे आणि स्व. रमेश नगरे यांनी आर्थिक सहकार्य केले.

महाआरतीचा एकल महिलांना मान यंदा मंडळाने बीड शहर व परिसरातील ७१ एकल महिलांना एकत्र आणत त्यांच्या हस्ते महाआरतीचा मान दिला. मंडळाच्या या उपक्रमाला पोलिस अधिक्षकांसह पोलिस दलातील पोलिसांनी सहकार्य केले आहे.

आज सामुदायिक अथर्वशीर्ष ८ सप्टेंबर रोजी आझाद हिंद गणेश मंडळ हिरालाल चौक बुरूडगल्ली येथे सकाळी सात वाजता अथर्वशीर्ष होणार असून या उपक्रमात पाचशे महिला सहभागी होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...