आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:एका रुग्णवाहिकेत कोंबून आणले चक्क 22 जणांचे मृतदेह; नंतर तीच रुग्णवाहिका रुग्णांसाठी वापरल्याचा प्रकार उघड

अंबाजोगाई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वाराती रुग्णालयाच्या कारभारावर नागरिक संतप्त

येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. दरम्यान, याच रुग्णवाहिकेतून नंतर रुग्णांचीही ने-आण केली जाते. स्वाराती रुग्णालयाच्या कारभारावर नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. कोरोनाच्या बाबतीत अंबाजोगाई हॉटस्पॉट झाला आहे. त्यामुळे येथील स्वाराती रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. त्यातच शेजारच्या सर्व तालुक्यांतून रुग्ण स्वाराती रुग्णालय आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांचेही प्रमाण वाढले आहे. रविवारी दुपारी ३० मृतदेहांवर एका वेळी अंंत्यसंस्कार झाले. या वेळी २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आले.

आणि मृतदेह एकाच वाहिकेतून
प्रशासनाने स्वाराती रुग्णालयाला दोन रुग्णवाहिका दिल्या आहेत. रुग्णांच्या तुलनेत त्या कमी आहेत. त्यामुळे ज्या रुग्णवाहिकेतून मृतदेहांची वाहतूक केली जाते तीच रुग्णवाहिका नंतर रुग्णांच्या वाहतुकीसाठी वापरली जाते. या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचा जीव मात्र धोक्यात येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

वाढीव रुग्णवाहिकांची मागणी
पहिल्या लाटेत स्वारातीला ५ रुग्णवाहिका होत्या. सध्या २ आहेत. वाढीव रुग्णवाहिकांसाठी १७ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे. रुग्णवाहिकांच्या कमतरतेमुळे आपत्कालीन स्थितीत रुग्णांची ने-आण करण्यासाठी या रुग्णवाहिकांचा वापर झालेला असू शकतो. - डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती रुग्णालय

यापुढे तातडीने अंत्यसंस्कार
कोरोनाबाधितांच्या मृत्यूनंतर तत्काळ अंत्यसंस्कार केले जातील. दिवसभरातील मृतदेह जमा करून एकाच वेळी अंत्यसंस्कार करू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत. - शरद झाडके, उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई.

बातम्या आणखी आहेत...