आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात जोरदार पाऊस:वाहून गेलेल्या ‘त्या’ बालकाचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

गेवराई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील चिंतेश्वर गल्लीतील तीन वर्षांचा बालक अंगणवाडीतून घरी येत असताना सोमवार, २६ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता घरासमोरच्या नालीत पडून विद्रूपा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. घडलेल्या घटनेच्या अर्धा किलोमीटर अंतरावर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बालकाचा मृतदेह सापडला आहे. बंटी ज्ञानेश्वर क्षीरसागर (३ रा. चिंतेश्वर गल्ली, गेवराई) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.बंटी क्षीरसागर आणि त्याचा भाऊ घरासमोरील बालवाडीत होते.दरम्यान सोमवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गेवराई शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नाल्याला भरपूर पाणी आले होते . त्यात तीन वर्षीय बालक वाहून गेला होता.