आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह:वाघाडी नदीपात्रात युवकाचा मृतदेह आढळला

घाटंजी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाघाडी नदी पात्रात एका ३४ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. राहुल रमेश पडलवार (३४) रा. दुर्गा माता वार्ड घाटंजी असे मृत युवकाचे नाव आहे. या युवकाने आत्महत्या केली की, घातपात याबाबत विविध चर्चेला उधाण आले आहे.

शहरातील दुर्गा माता वार्डातील युवक राहुल पडलवार हा यवतमाळ येथील रेमंण्ड कंपनीत काम करत होता. परंतु मागील काही दिवसांआधी घरी नातेवाईकांचा मृत्यू झाल्याने तो घरी परतला होता. परंतु १२ नोव्हेंबरला तो घरून बाहेर निघून गेला होता. सायंकाळी अचानक त्याचा मृतदेह वाघाडी नदी पात्रात पाण्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...