आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेचा मृतदेह आढळल्याने खळबळ:पोलिस उपअधीक्षकांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात

गेवराई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पांचाळेश्वर तांडा येथे गळफास घेतलेल्या अवस्थेत विवाहितेचा मृतदेह आढळल्यानंतर सदरील घटना ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत विवाहितेचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेत तालुक्यातील उमापूर येथून जाणारा राज्य महामार्ग एक तास रोखला. शेवटी पोलिस उपअधीक्षकांनी भेट देऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी आंदोलन मागे घेतले. सोमवार, १ ऑगस्ट रोजी हे आंदोलन झाले.

अंजली सुनील राठोड (२६) हिचा सात वर्षापूर्वी सुनील किसन राठोड याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवस चांगले नांदवल्यानंतर अंजली हिचा सासरी छळ होऊ लागला. कौटुंबिक वादातून दोन दिवसांपूर्वी विवाहितेचा पती सुनील याने कीटकनाशक प्राशन केले होते. दरम्यान, पांचाळेश्वर तांडा-पवारवाडी येथे एका शेतात अंजली हिचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मुलीला सासरच्या लोकांनी जिवे मारून तिचा मृतदेह शेतात झाडाला लटकवला असून आत्महत्येचा बनाव केल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाइकांनी केला.

बातम्या आणखी आहेत...