आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:निकालाची उज्वल परंपरा कायम;  प्राजक्ता गायकवाडचे प्रावीण्यासह यश

गेवराई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत गेवराई शहरातील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही उत्तम यश मिळवत निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे .महाविद्यालयाचा निकाल ९६.९६ टक्के लागला असून विज्ञान शाखेचा निकाल ९८.५७ टक्के तर कला शाखेचा निकाल ९५.१६ टक्के इतका लागला आहे.

कला शाखेतून सर्वप्रथम प्राजक्ता ज्ञानेश्वर गायकवाड, द्वितीय निशा बप्पासाहेब पवार, तृतीय वैष्णवी किशोर , चतुर्थ आशा राजू वाघमारे हे ठरले. यासह विज्ञान शाखेतून सर्वप्रथम श्रीनिवास गणेशराव क्षीरसागर, द्वितीय क्रमांक भक्ती अनिल जगताप तर तृतीय क्रमांक कांचन त्रिंबक चव्हाण हिने पटकावला.

सर्व गुणवंता विद्यार्थ्यांचा सुशील शिक्षण संस्थेचे सचिव दिनेश पवार, अध्यक्ष सुशील पवार, सेवानिवृत्त शिक्षक गणपतराव गायकवाड, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.आर. राठोड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक डी.एम. चव्हाण यांच्या हस्ते मिठाई देऊन अभिनंदन करण्यात आले. प्रा.बी.आर. राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शाम वादे यांनी केले तर आभार प्रदर्शन कारके यांनी केले. यावेळी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...