आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात स्वच्छतेच्या आराखड्यात असलेल्या ६५३ गावांत शौचालयांचा वापर करणे, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन तसेच शाळा, अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय यांना शौचालयाची सुविधा उपलब्ध असणे, गावातील यात्रा व बाजारतळाच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, ‘घर तेथे शोषखड्डा’ निर्माण करणे यासाठी २ ऑक्टोबरपर्यंत ओडीएफ प्लस मॉडेल घोषित करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके यांनी दिली. स्पर्धेच्या जनजागृती उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश मोकाटे उपस्थित होते.
जिल्ह्यात १३६७ गावांत हगणदारीमुक्त घोषित करण्याचा उपक्रम ग्रामसभेतून घेण्यात आलेला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात ६५३ गावांचा आराखड्यात समावेश केलेला आहे. त्यात ५ हजार लोकसंख्येपेक्षा जास्त ५० गावे आहेत. ही गावे ‘ओडीएफ प्लस’ मॉडेल म्हणून घोषित करायचे आहेत.
ओडीएफ प्लस मॉडेल घोषित करण्यासाठी गावात उपलब्ध असलेली सर्व शौचालये वापरत असावीत तसेच घनकचरा व्यवस्थापनाचे काम पूर्ण व्हावे, घर तेथे शोषखड्डा उपलब्ध करून घ्यावा, गावात बाजारतळ असेल किंवा येणाऱ्यांसाठी सार्वजनिक शौचालय सुविधा उपलब्ध असणे, ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा व इतर कार्यालयांना शौचालय सुविधा व सांडपाण्यासाठी शोषखड्डा असणे बंधनकारक असणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके म्हणाले. ग्रामपंचायत व ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती तसेच स्वच्छाग्रही व पाणी गुणवत्ता अभियानातील पाच महिलांच्या मदतीने गावात स्वच्छता फेरी काढून जनजागृती करणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.