आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:अनुदान व पीक विम्यासाठी निवेदने‎ मुख्यमंत्र्यांना देण्याच्या अभियानास सुरुवात‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या‎ पावसामुळे नुकसान होऊनही नव्या शासकीय‎ नियमानुसार मदत मिळालेली नाही. तक्रारी करूनही‎ पीक विमा कंपनी सर्व्हे करत नाही. बीड तालुक्यात‎ २१ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी‎ नाकारल्या आहेत. लाखो तक्रारी पेंडिंग असून‎ सगळा गोंधळ कारभार पीक विमा कंपनीने लावला‎ असून १० हजार शेतकऱ्यांची निवेदने शेतकऱ्यांचे‎ प्रश्न निकाली लावावेत म्हणून मुख्यमंत्री एकनाथ‎ शिंदे यांना पाठवण्याच्या अभियानास कालपासून‎ सुरुवात करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्याला‎ प्रचंड पाऊस होऊनही नुकसान भरपाई दिली गेली‎ नाही. ऑगस्ट महिन्यात पाऊस नसल्याने‎ सोयाबीनचे नुकसान झाले त्याबाबत अग्रिम सर्व‎ मंडळांना दिला गेला नाही. सरसकट पीक विमा व‎ शासनाची नुकसान भरपाई मिळणे आवश्यक‎ असताना शेतकऱ्यांवर हे सरकार दुर्लक्ष करत आहे.‎ पालकमंत्री अतुल सावे हे शेतकऱ्यांचे प्रश्नदेखील‎ समजून घेत नाहीत.

त्यामुळे शेतकऱ्यांची निवेदने‎ जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात‎ येणार असून त्यांनी विशेष बैठक लावून जिल्ह्यातील‎ शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात‎ येणार आहे. चौसाळा, घाटसावळी, नाळवंडी,‎ ताडसोन्ना, पालवन, पिंपळनेर, माळापुरी, मैंदा,‎ कुर्ला, आंबेसावळी, नामलगाव या गावांमधून‎ शेतकऱ्यांनी शेकडोंच्या संख्येने निवेदने दिली.‎

बातम्या आणखी आहेत...