आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिन्यांपूर्वी मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाचे काय?:आरक्षण बचाव समितीच्या अध्यक्षांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला तीन महिन्यांपूर्वी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल आरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष शिवाजी कवठेकर यांनी केला आहे.

आरक्षणाविषयीच्या कार्यक्रमात ते म्हणाले की, शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे यांच्या अंत्यविधीच्या वेळी श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायकरावांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही व मराठा समाजाला आरक्षण देणारच, अशी ग्वाही दिली होती. मात्र, तीन महिने उलटूनही याबाबत निर्णय झालेला नाही. सरकारने मेटे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नये. मेटे यांनी आयुष्यभर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा दिला हे लक्षात ठेवावे. २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी नेमलेल्या न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड आयोगाने मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण शिफारस केलेली असतानाही अद्याप समाज आरक्षणापासून वंचित आहे. किमान दिवंगत लोकनेते मेटे यांच्या अंत्यसमयी दिलेल्या शब्दाला जागत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी कवठेकर यांनी केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेकडून शिवसंग्राममध्ये फोडाफोडी होत असल्याचा आरोप केला जात होता. त्याविषयी संबंधित मंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केल्यावर शिवसंग्रामच्या गोटात शांतता असल्याचे दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...