आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहातउसणे घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिलेला धनादेश न वठल्याने याप्रकरणात न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने आरोपी असलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्याला ७ लाख रुपयांचा दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
बबन केशव लहाने यांच्याकडून आरोपी अशोक विश्वनाथ पाटील यांनी हातउसने ५ लाख ७५ हजार रुपये घेतले होते व मुदतीत हातउसने रक्कम मागितल्यानंतर एवढी रक्कम माझ्याकडे रोख स्वरुपात नसून माझ्या बँकेतील खात्यावर आहे, तुम्ही सदरील रक्कम धनादेशाद्वारे घ्यावी, असे म्हणून २३ ऑगस्ट २०१७ रोजी ५ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेश अनादरीत झाला. त्यानंतर आरोपीने नोटीस पाठवूनही पाटील यांनी रक्कम दिली नाही म्हणून लहाने यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये धाव घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.