आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेवराई तालुक्याच्या ग्रामीण भागातील आणि याच मातीत घडलेला एक तरी खेळाडू भारताचे नेतृत्व करताना राष्ट्रीय पातळीवर खेळेल तेव्हांच माझ्या पदवीचे चिज होईल, असे भावनिक प्रतिपादन क्रीडा महोत्सवाचे आयोजक रणवीर पंडित यांनी केले.
जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित क्रिडा महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित क्रिडा महोत्सव २०२२ चा समारोप ॲथलॅटिक्सच्या अंतिम सामन्याने झाला. या वेळी जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयसिंग पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे शहराध्यक्ष दिपक आतकरे, जयभवानी कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, सामाजिक कार्यकर्ते शेख आवेज, युवानेते पृथ्वीराज पंडित, स्पर्धा आयोजक रणवीर पंडित शिवशारदा मल्टिस्टेटचे व्यवस्थापक गणेश रुकर, सुनिल कलंत्री, अजित दायमा आदी हजर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.