आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:नेपाळ येथे झाली स्पर्धा; केजच्या 31 खेळाडूंनी कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्ण, रौप्य, कांस्यपदक

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत केज तालुक्यातील ३१ खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक पटकावले. त्याबद्दल या खेळाडूंचा सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत केज येथील साहिल मस्के, उत्तरेश्वर झेंडे, बाजीराव शिंदे, स्वप्निल तांदळे, अमर सिरसट, आकाश घुले, शनिरोज झाडे, अतुल घुले, आर्या सिरसट, विनोद सिरसट, गौरी उगलमुगले, समर्थ शेरेकर, प्रथमेश तांदळे, प्रतीक्षा क्षीरसागर, ज्ञानेश्वर जाधवर, धम्मदीप भोले, प्रणव डोईफोडे, सूरज पारवे, रचना सिरसट, ईश्वरी हाके, अनिकेत घुले, सक्षम ढाकणे, अनिकेत करवंदे, दीपक डावकर, तेजस तांबडे, सागर घुले, साक्षी गालफाडे, प्रिन्स घोडके, करण लकडे या खेळाडूंनी सहभाग घेत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक पटकावले. या खेळाडूंचा शनिवारी शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात सहायक पोलिस अधीक्षक कुमावत यांच्या हस्ते सत्कार केला, तर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे अनिल ठोंबरे व मुख्य प्रशिक्षक बद्रीनाथ तळेकर यांचाही विशेष सत्कार केला. कार्यक्रमाला अशोक सोनवणे, दशरथ चौरे, धनंजय कुलकर्णी, विजय आरकडे, रमेश गुळभिले, राजू इनामदार आदी उपस्थिते होते.

बातम्या आणखी आहेत...