आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बीड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची रचना निश्चित; पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या काळात येऊ घातलेल्या बीड नगरपालिका निवडणूक, युवक पक्ष बांधणी व विस्ताराच्या अनुषंगाने बीड शहरातील युवकांची शिवसंग्राम भवन, नगर नाका बीड येथे रविवारी व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती, यात आ. विनायकरावजी मेटे यांच्या सुचनेनुसार विविध पदांकरिता पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

शिवसंग्रामचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामहारी मेटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत बीड शहरातील विविध प्रभागातील प्रभाग प्रमुखांच्या सोबतच शहर कार्यकारणी सदस्यांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत यात प्रामुख्याने बीड शहर कार्यकारिणी सदस्य म्हणुन अक्षय डोंगरे यांनी निवड करण्यात आलेली आहे, सोबतच प्रभाग क्रमांक २ प्रमुख पदी सनी सेठ तांगडे, प्रभाग क्रमांक ८ प्रमुख पदी सागर पिल्ले, प्रभाग क्रमांक १० प्रमुख पदी सूरज बहीर, प्रभाग क्रमांक २५ पदी सामाजिक चळवळीतील अग्रगण्य कार्यकर्ते अशोक ढोले पाटील, सिद्धेश्वर नगर, बहिरवाडी हद्दीतील शहरी विभाग प्रमुख पदी शाम शेंडगे तसेच खंडेश्वरी,पूरग्रस्त कॉलोनी भागातील कार्यकर्ते समाधान कोरडे, त्याच बरोबर महाविद्यालयीन युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी भागवत खेत्रे यांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत. यावेळी बोलताना बीड शहराच्या सर्वांगीण विकास साध्य करायचा असेल तर आ विनायकराव मेटे साहेब हेच नेतृत्व असणे आवश्यक असल्याचे आता बीड शहरातील युवक एकमुखाने म्हणत आहेत.

नगरपरिषदेत कसलीही सत्ता नसताना आ. विनायकराव मेटे यांनी शहराच्या विकासासाठी मोठ्‌या प्रमाणावर निधी खेचून आणला. शहरातील बिंदूसुरा पूल, वळण रस्ता आदींबाबत थेट केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत मागणी यशस्वी केली, स्वच्छता, आरोग्य सारख्या बाबींवर केलेल्या कार्यांमुळे आ. विनायकरावजी मेटे हे युवकाच्या गळ्यातील ताईत बनत असून युवकांचा ओढा त्यांच्याकडे वाढत आहे. युवकांचा विकास, महिलांचे सक्षमीकरण, स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये विकासात्मक काम करण्याचे प्रभावी धोरण आ. विनायकरावजी मेटे यांच्याकडे असल्याचे बीडच्या युवकांनी ओळखले आहे.

बातम्या आणखी आहेत...