आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शस्त्र व शास्त्राचा संगम म्हणजे भगवान परशुराम; शशिकांत हरी यांचे प्रतिपादन

पाटोदा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान विष्णुंचा अवतार असलेल्या भगवान परशुराम यांचे व्यक्तीमत्त्व आपल्या अत्युच्च प्रतिभेने झळाळत होते. शस्त्र व शास्त्राचा संगम म्हणजे भगवान परशुराम होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक शशिकांत हरी यांनी केले.

पाटोदा येथे मंगळवारी (ता.३ मे) भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील भामेश्वर मंदिर येथे परशुराम जयंती निमित प्रतिमा पुजन पार पडले. ज्येष्ठ नागरिक शशिकांत हरी, बंडू देशमुख यांनी प्रतिमा पूजन करत मार्गदर्शन केले. यावेळी माजी नगरसेवक विजय जोशी, प्रशांत देशमुख, गणेश पांडव, महेश बेदरे, अमोल जोशी, अनिल पांडव, श्रीपाद जोशी, गणेश खिस्ते, विलास पारगावकर, निखिल डबीर, मंगेश कुलकर्णी, अभिजीत देशमुख, अभिजीत वैद्य, उमेश पांडव, राहुल देशमुख, बाळासाहेब शिंदे, अजय धस, संतोष गचांडे आदींसह समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी इतर मान्यवरांनीही भगवान परशुराम यांच्या चरित्रावर माहिती दिली. दरम्यान, पाटोद्यासह बीड येथेही स्वा.सावरकर विचार मंचच्या वतीने भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रा.अजिंक्य पांडव यांनी भगवान परशुरामांचे तेज हे आजन्म झळकत राहणार असून त्यांचे व्यक्तित्व हे निरंतर प्रेरणा देणारे आहे, असे सांगितले. यावेळी इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी बीड शहर व परिसरातील समाज बांधव हजर होते.

धारूर शहरातही भगवान परशुराम जयंती साजरी
धारूर येथे अक्षयतृतीयेनिमीत्त एकता मंडळाच्या वतीने बालाजी मंदिरात भगवान परशुराम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक प्रमोदकुमार तिवारी, भुंजगराव पाटील, सुधाकर काळे, सुधीर चंद्रे, राहुल काळे, संतोष तिवारी, नारायण काळे, ॲड.रवींद्र अवस्थी, डॉ.कपील मिश्रा, हरीष अवस्थी, किसनराव काळे, रिषभ अवस्थी, रमेश पांडे, राजेश तिवारी, अनंत काळे, शिवानंद खिंडरे, जागृती तिवारी यांच्यासह शहर व परिसरातील नागरिक, युवक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...