आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:कोरोनामुळे समाजात माणुसकीची भावना वाढीस लागली; माजलगावात आमदार रोहित पवार यांचे प्रतिपादन

माजलगाव7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दर्पण, कोरोना योध्दा पुरस्काराचे वितरण

कोरोनामुळे जग हादरले. अशा वेळी कुटुंब संस्थेचे महत्व अनेकांनी जाणले. प्रत्येक जण आप आपल्या परीने जमेल ती मदत इतरांना करु लागला. कोरोनामुळे समाजात माणुसकीची भावना वाढीस लागली. आपले कोरोना वॉरियर्स डॉक्टर, सरकारी कर्मचारी, सामाजिक संघटना, पोलिस यंत्रणा यांनी केलेल्या कार्याचे महत्व जाणले पाहीजे. असे प्रतिपादन जामखेड-कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी केले.

माजलगाव पत्रकार संघाच्यावतीने शनिवार १६ जानेवारी रोजी दर्पण, कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश सोळंके तर प्रमुख पाहुणे माजी आमदार मोहनराव सोळंके, राधाकृष्ण होके पाटील, राजेंद्र जगताप, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक डक, जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंह सोळंके, भाजप नेते रमेश आडसकर, नगराध्यक्ष शेख मंजूर, आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना रोहित पवार म्हणाले की, कोरोना काळात अनेकांनी फु ल ना फुलाची पाकळी म्हणून इतरांना मदत केली. आज पत्रकार संघाच्या वतीने प्रतिनिधीक स्वरुपात कोरोना वॉरिअर्सचा सन्मान करण्यात आला. परंतू हजारो लोक ज्यांनी आपली पर्वा न करता अनेकांची मदत केली आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुढच्या वर्षी या कार्यक्रमासाठी आणण्यासाठी मी प्रयत्नशिल राहिल असे आमदार रोहित पवार म्हणाले.भाजप नेते रमेश आडसकर यांच्या भाषणाचा उल्लेख करुन आमदार रोहित पवार म्हणाले की, पवार घराण्याच्या राजकीय वारशाचा फायदा मला नक्कीच झाला. मी मतदारसंघ निवडत असताना मी असा मतदारसंघ निवडला की मी जिथे निवडून येईल का नाही हे न पाहता मला त्या मतदारसंघात काम किती करावे लागेल याचा अभ्यास मी प्रथम केला. आणि नंतर मी जामखेड कर्जत मतदारसंघातून निवडून आलो. यावेळी बोलताना आमदार सोळंके म्हणाले कि, पत्रकारिता करताना पत्रकारांना येणाऱ्या समस्या सोडविण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन असे आश्वासनही आमदार सोळंके यांनी यावेळी बोलताना दिले.प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश यादव तर, सूत्रसंचालन पांडुरंग उगले यांनी केले.

दर्पण पुरस्काराने तुकाराम येवलेंचा गौरव

माजलगाव पत्रकार संघाने ज्येष्ठ पत्रकार तुकाराम येवले यांना आज दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.डॉ. सुरेश साबळे, डॉ. गजानन रुद्रवार, डॉ. अनिल परदेशी, डॉ. यशवंत राजेभोसले, डॉ. श्रेयेस देशपांडे, डॉ. स्नेहल जाधव, डॉ. पूजा देशमुख, टेंबे गणेश मंडळ युवा ग्रुप, राजेश्री, राजेंद्र आनंदगावकर व मंजरथ ग्रामस्थ, सुरेंद्र रेदासनी, रियाज काझी, शेख बाबा, एकनाथ मस्के, शाम देशमुख, अझहर नाईक, नितीन क्षीरसागर. यांना कोरोना योध्दा पुरस्काराने गौरवण्यात आले. नगर परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, शहर पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस ठाणे या कार्यालयाला कोरोना योद्धा विशेष सन्मान देण्यात आला

आडसकर, सोळंकेत जुगलबंदी

माजलगाव पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला भाजप नेते रमेश आडसकर, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके एकच व्यासपीठावर आले तेंव्हा त्यांच्या भाषणातून एकमेकावर चांगलेच आरोप-प्रत्यारोप झाले. दोघांनीही एकमेकांनी चांगल्याच कोपरखळ्या मारल्या.

बातम्या आणखी आहेत...