आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मोंढा मार्केट येथील कन्हैया ट्रेडर्सजवळील मोकळ्या जागेत काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यावरून फौजदार वैभव सारंग, जमादार बालाजी दराडे, संभाजी दराडे, पोलिस नाईक अनिल मंदे, संतोष गित्ते यांच्या पथकाने ५ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास छापा मारला.
या वेळी नगरसेवक रामचंद्र विठ्ठलराव गुंड (रा. गुंडगल्ली), पं.स.चे माजी सभापती बालासाहेब रामराव जाधव, सुशील सज्जन अंधारे (दोघे रा. मोंढा मार्केट, केज), माजी स्वीकृत नगरसेवक शेषराव लक्ष्मण कसबे (रा. वकीलवाडी, केज ), निरंजन अशोकराव बोबडे (रा. कळंब रोड, केज), मनोज पांडुरंग घोरपडे (रा. समर्थ नगर, केज), लिंबाजी शंकरराव शिंदे (रा. समता नगर, केज) यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ९,३०० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलिस नाईक दिलीप गित्तेंच्या फिर्यादीवरून ७ जणांवर केज पोलिसांत गुन्हा दाखल केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.