आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर परिषद काम करणार

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय बंजारा परिषदेची तालुका स्तरीय बैठक गेवराई येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव प्रा. पी. टी. चव्हाण होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष बाजीराव राठोड,महंत सुदरसिंग महाराज,कृष्णा राठोड,बाळराजे राठोड,अमर राठोड उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेची जिल्हा व गेवराई तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. राज्यातील समाजाच्या मुलभूत प्रश्नावर ही परिषद काम करणार आहे.

या वेळी गेवराई येथील बैठकीत राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी बाजीराव राठोड उपाध्यक्षपदी अभिजीत राठोड यांची निवड राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी बाजीराव राठोड उपाध्यक्षपदी अभिजीत राठोड यांची निवड राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी बाजीराव राठोड तर उपाध्यक्षपदी अभिजीत राठोड यांच्यासह जिल्हा संघटक साहेबराव राठोड, जिल्हा सल्लागारपदी राजाभाऊ जाधव, युवा जिल्हा अध्यक्षपदी कृष्णा राठोड, जिल्हा उपाध्यक्ष अमोल राठोड यांची निवड केली. तर गेवराई तालुकाध्यक्षपदी संजय चव्हाण, तालुका सचिवपदी रमेश राठोड, तालुका कार्याध्यक्षपदी पवन जाधव, तालुका उपाध्यक्षपदी श्यामराव पवार, विष्णू राठोड यांची प्रसिद्धी प्रमुखपदी, तालुका प्रवक्तेपदी एकनाथ आडे, तालुका सहसचिव राजेंद्र जाधव,तालुका संघटक म्हणून परमेश्वर राठोड, तालुका संघटक हिरामण पवार,विठ्ठल चव्हाण यांची संघटकपदी, सहकोषाध्यक्षपदी पप्पू चव्हाण युवा आघाडी तालुका प्रमुख दत्ता राठोड, तालुका उपाध्यक्षपदी विकास राठोड, तालुका कार्याध्यक्ष सुजीत पवार, सोशल मिडीया प्रमुखपदी अविनाश राठोड,तालुका संघटकपदी बाळराजे जाधव,तालुका संघटक किरण राठोड,गेवराई शहर प्रमुखपदी रामेश्वर अर्जून जाधव,जातेगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदी मारोती पवार, पाचेगाव जि.प.गट अध्यक्षपदी बंडू राठोड यांची सर्वानुमते निवड केली.

या वेळी प्रा. चव्हाण यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत परिषदेचे ध्येय धोरणे व आचारसंहिता समजावून सांगितली. या वेळी गोर धर्म प्रचारक लक्ष्मण महाराज,अचित महाराज, हरिभाऊ आडे महाराज,मनोज जाधव, एकनाथ आडे, प्रकाश राठोड, रवींद्र राठोड,बबन राठोड, आकाश पवार, संकेत राठोड, भारत चव्हाण,अजित पवार, सतीश राठोड, प्रकाश जाधव, पप्पू आडे आदी उपस्थित होते. गेवराई तालुका अध्यक्ष संजय चव्हाण यांनी या बैठकीचे नियोजन केले होते.

राज्यातील दीड कोटीपेक्षा जास्त संख्येने असलेल्या बंजारा समाजाला सामाजिक शैक्षणिक व राजकीय न्याय हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद कार्यरत आहे. सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या महाराष्ट्रातील साडेबारा हजार बंजारा तांडे व वस्त्यांवर जोड रस्ते, पिण्याचे पाणी, स्मशानभूमी, मतदान केंद्रे, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व्यायामशाळा वाढीव शाळा खोल्या अशा मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही परिषद काम करणार असून सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे, असे प्रा. चव्हाण यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...