आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतमहोत्सव:देशाला आज संविधाननिष्ठ नेतृत्वाची खरी आवश्यकता ; डॉ. येळेगावकर यांनी मांडले विचार

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला आज खऱ्या संविधाननिष्ठ नेतृत्वाची आवश्यकता आहे. संविधानाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार देश उभारणीचे प्रभावीपणे कार्य झाले पाहिजे, असे प्रतिपादन सोलापूर येथील विचारवंत डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले.

येथील श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कर्मचारी गणेश व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना डॉ. येळेगावकर यांनी बोलत होते. ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ याविषयावर त्यांनी आपली भूमिका मांडली. अनेक स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून स्वातंत्र्याची प्राप्ती झाली. या पंचाहत्तर वर्षांच्या काळात वेगवेगळ्या पंतप्रधानांनी देशाच्या विकासाची स्वप्ने पाहिली व ती पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले हे विसरून चालणार नाही. पं नेहरुंनी भारताच्या विकासाचा पाया घातला, लोकशाही, समाजवाद रुजविण्याचा प्रयत्न केला. लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांनी कणखर धोरणाचा जगाला परिचय करून दिला तर राजीव गांधी यांनी वेगवेगळे करार करून देशात शांतता व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला, असे मत त्यांनी व्यक्त केले. नरसिंह राव यांनी नवीन आर्थिक धोरण स्वीकारून देशाच्या आर्थिक विकासाची दारे खुली केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीर विषयीचे ३७० कलम रद्द करून जम्मू काश्मीरला भारताच्या मुख्य प्रवाहात आणल्याचे प्रतिपादन डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले. भारतीय लोकशाही मजबूत असली तरी देशातील आरोग्य, शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे. विचारांची पूजा झाली पाहिजे, विचारस्वातंत्र्य टिकले पाहिजे तरच देश बलशाली होईल, असे प्रतिपादन डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांनी भूषवले.

बातम्या आणखी आहेत...