आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडच्या मंजरथला वृद्धावर सुरीने वार:उसने पैसे मागितल्याने दांपत्याने केला खून

माजलगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उसने दिलेले पाच लाख रुपये परत मागितल्याचा राग आल्याने पती-पत्नीने एका ६५ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने भररस्त्यात वार करून खून केला. ही घटना एक मे रोजी

सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तालुक्यातील मंजरथ येथे घडली.
चार वर्षांपूर्वी शेती घेण्यासाठी राजाभाऊ सर्जेराव गायकवाड व दैवशाला राजाभाऊ गायकवाड (रा. मंजरथ) या दांपत्याला याच गावातील मित्र मारुती चुरामण घटे (६५) यांनी पाच लाख रुपये दिले होते. या व्यवहारावरून मंजरथ येथील बसस्थानकावर त्यांच्यात वाद सुरू होता. दिलेले पाच लाख रुपये परत मागितल्याचा राग मनात धरून दैवशालाने मारुती यांचा हात धरला, तर राजाभाऊने सुरीने मारुती यांच्या छातीत, डोक्यात, खांद्यावर व इतर ठिकाणी वार केले. दरम्यान, मृताचा मुलगा राजा मारुती घटे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजाभाऊ व दैवशाला गायकवाड यांच्याविरोधात ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलिस अधीक्षक रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंह जोनवल, पोलिस उपनिरीक्षक सचिन दाभाडे हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...