आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दी:बार्शीटाकळीत रसवंत्यांवर गर्दी वाढली; परिणामी शीतपेये आणि रसवंत्यांच्या दुकानांवर गर्दी

बार्शीटाकळी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचे चटके प्रचंड वाढत असून, बार्शीटाकळी शहरातही असह्य उन जाणवत आहे. परिणामी शीतपेये आणि रसवंत्यांच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी वाढत आहे.

शहरातील पोलिस स्थानक, तहसील कार्यालय, पंचायत समिती शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजानिमित्त नागरिक भर उन्हात मोठ्या संख्येने येतात. दुपारच्या उन्हाचा अनेकांना फटका बसतो. अंगाची होणारी काहिली शमवण्यासाठी शहरात शीतपेये आणि रसवंत्या सुरू झाल्या आहेत. सकाळी ११ वजल्यापासूनच रसवंत्यांवर नगरिकांची गर्दी सुरू होत आहे.

इतर शीतपेये यांच्या तुलनेत रस हे आरोग्यवर्धक पेय असल्याने नागरिक रसाला पसंती देत आहेत. शहरात उन्हाळ्यात रसवंती व्यवसायाला प्रतिसाद मिळतो त्यामुळे हा व्यवसाय बेरोजगारांसाठी फायद्याचा ठरत असल्याचे बायपास चौकातील महालक्ष्मी रसवंतीचे मालक अशोक राठोड त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...