आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:मुलाने केलेल्या मारहाणीत जखमी पित्याचा मृत्यू; खर्चास पैसे न दिल्यामुळे केली होती मारहाण

केज15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खर्च करण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नी आणि मुलाने भांडण करत मुलाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या पित्याचा आठ दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू झाला. ही घटना बेंगळवाडी (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी मुलगा आणि पत्नी या दोघांविरुद्ध पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला असून त्या दोघांना ७ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने झाले आहेत.

बेंगळवाडीतील रमेश सोनाजी शिंदे (वय ३८), पत्नी हिराबाई शिंदे आणि त्यांचा १९ वर्षाचा मुलगा ऋषिकेश शिंदे यांच्यात २३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास भांडण सुरू होते. नंतर रमेश शिंदे घराबाहेर आले. त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी व मुलगा आला. ते त्यांना पैसे मागत होते. मात्र, त्यांनी माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगताच ऋषिकेशने तिफणचा लाकडी फण उचलून वडील रमेश शिंदेंच्या डोक्यात मारला. त्यामुळे त्यांचे डोके फुटून रक्तस्त्राव होऊन ते खाली पडून ते बेशुद्ध पडले होते. नागरिकांच्या मदतीने रमेश शिंदेंना बीडच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले.

परंतु, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने २४ रोजी पहाटे पुणे येथे ससून रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, रमेश शिंदेंचा उपचारादरम्यान २ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. मृताचा भाऊ बाबूराव सोनाजी शिंदे यांच्या फिर्यादीवरून रमेश शिंदेंची पत्नी हिराबाई शिंदे, मुलगा ऋषिकेश शिंदे या दोघांविरुद्ध केज पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. विडा बीटचे जमादार उमेश आघाव व पोलिस नाईक बाळू सोनवणे यांनी दोघा मायलेकाला ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...