आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:दोन गटांना जोडणाऱ्या चिंचोली फाटा ते नांदूरघाट रस्त्याची दयनीय अवस्था; पावसाळा तोंडावर येऊन ठेपल्याने या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार ?

केज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील चिंचोलीमाळी व नांदूरघाट या दोन जिल्हा परिषद गटातील बहुतांश गावे ही तालुक्याला जोडणाऱ्या चिंचोली फाटा ते नांदूर घाट रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना वाहन चालकांची कसरत सुरू आहे. तर अपघाताला निमंत्रण देणारा रस्ता झाल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून व त्रास सहन करीत प्रवास करावा लागत आहे. आता पावसाळा तोंडावर येऊन ठेपल्याने या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार ? असा सवाल उपस्थित करीत लोकप्रतिनिधींनी त्वरित काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा अशी मागणी या गावांतील नागरिकांतून होत आहे.

केज - कळंब रस्त्यावरून चिंचोली फाटा ते चिंचोलीमाळी, कापरेवाडी, चौफाळा, नाव्होली, शिरूरघाट, नांदूरघाट असा हा रस्ता पुढे चौसाळ्याला जातो. तर चिंचोलीमाळी व नांदूरघाट या जिल्हा परिषदेच्या दोन गटातील बहुतांश गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी महत्वाचा हा रस्ता आहे. दयनीय अवस्था झालेल्या या रस्त्यावरून खड्डे चुकविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत असून वाहन चालक परेशान झाले आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघाताला निमंत्रण मिळत असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर दुचाकी, तीन व चार चाकी वाहने या खड्ड्यात आदळत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नियमितपणे प्रवास करणाऱ्या नागरिकांना मणक्याचे आजार जडू लागले आहेत. मात्र मागील दोन महिन्यांपासून रस्त्याच्या कामाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला, आता निविदा प्रक्रियेत आहे. या आठवड्यात काम सुरू होईल.

तर चिंचोली फाटा ते चौफाळा पर्यंतच्या रस्त्याचे दुरुस्तीचे आणि चौफाळा ते नांदूरघाटपर्यंत पूर्ण काम होणार अशा प्रकारची उत्तरे ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक अभियंत्यांकडून दिली जात आहेत. मात्र मे महिना ही आता अर्धा संपत आला असून जून महिन्यात पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम कधी सुरू होणार आणि कधी पूर्ण असा सवाल या गावांच्या नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

वाहनचालकांना काम होण्याची प्रतीक्षा
या रस्त्यावरून दोन्ही गटातील बहुतांश गावांतील नागरिकांना ये - जा करावी लागते. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी आहे. मात्र रस्त्याचे काम काही वर्षांपासून प्रलंबित राहिले. परिणामी, रस्त्यावर खड्डे पडलेले असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तर प्रत्येक वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे भरून मलमपट्टी करण्याचे काम केले जात आहे. मात्र पावसाळ्याच्या काळात पावसाने खड्डे पुन्हा उघडे पडत आहेत. त्यामुळे पुन्हा नागरिकांना आणि वाहन चालकांना काम होण्याची प्रतीक्षा करावी लागते.

बातम्या आणखी आहेत...