आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर शिंदे वस्तीला दिली भेट

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील शिंदे वस्तीच्या रस्ता व पूल प्रश्नाचा गाजावाजा झाल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शिंदे वस्तीला भेट देऊन पाहणी केली.

पाटोदा तालुक्यातील सौताडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत शिंदे वस्ती येते. या वस्तीला जोडणारा पुल किंवा रस्ता नसल्याने ग्रामस्थांना तलावातून चप्पूच्या सहाय्याने मागील अनेक वर्षांपासून ये- जा करावी लागते. हा प्रश्न समोर आल्यानंतर वर्षभरापूर्वी मुंबईच्या बांद्रेकरवाडी गणेश मंडळाने चप्पूचा प्रवास असुरक्षित असल्याने ग्रामस्थांना दोन तराफे सुरक्षित प्रवासासाठी भेट दिले होते. दरम्यान, रस्ता, पूल प्रश्नावर नागरिकांनी अनेकदा आंदोलनही केली आहेत. मात्र, हा प्रश्न सुटलेला नाही. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिंदे वस्ती ग्रामस्थांनी घेतला होता. याबाबत प्रशासनाला ११ डिसेंबर रोजी निवेदन दिले होते. यानंतर आठवडाभरापूर्वी मध्यरात्री शिंदे वस्तीकडे जाणारे तराफे जाळून टाकण्यात आले होते.

दरम्यान, तराफे जाळल्याने ग्रामस्थांना पुन्हा थर्माकोलच्या चप्पूवरुन प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनाही चप्पूवरुनच शाळेत यावे लागत आहे. चार दिवसांपूर्वी काही विद्यार्थी पाण्यातही पडले होते. यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. मात्र, निवडणुकीमुळे ही बैठकही रद्द झाली. शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शिंदे वस्तीला भेट देऊन पाहणी केली व प्रशासनाला सूचना दिल्या.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन ३ महिन्यापासून तहसीलदार रूपाली चौगुले यांनी शिंदेवस्तीवरील ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थांना वेठीस धरले आहे. जलसमाधी आंदोलन दरम्यान दोन दिवसात रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन देऊन २ महिने दुर्लक्ष केले. उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांनी बैठकीस बोलावून स्वतः गैरहजर राहिले. त्यामुळे आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदोलन केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...