आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालक पसार:कारला धडक देऊन टँकरचा चालक पसार

बीड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्याच्या कारला धडक देऊन टँकर चालक पसार झाल्याची घटना वानगाव जवळ शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास भारती हे जखमी झाले आहेत.

जिल्हा वाहतूक शाखेत सहायक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले कैलास भारती हे आपल्या गावी भूम (जि.उस्मानाबाद) येथे गेले होते. शनिवारी स्वत:च्या कारमधून (एमएच २३ बीसी- ०३३१) एकटेच बीडकडे येत होते. धुळे-सोलापूर महामार्गावर वानगाव फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या एका अज्ञात टँकरने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. या अपघातात यानंतर कार थेट रस्त्याखाली येऊन उलटली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला.

बातम्या आणखी आहेत...