आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी:हरभरा नोंदणीस ई-पीक पाहणी अॅप ठरतेय अडसर

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू, शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद

तालुक्यात तीन हरभरा खरेदी केंद्रे सुरु असून खरेदी साठी शेतकऱ्यांची नोंदणी करणे सुरु आहे. नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणींमुळे शेतकऱ्यांनी हरभरा खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पिकांची नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इ पिक पाहणी अॅप ची पूर्ण माहिती नसल्यामुळे शेतकऱ्याच्या हरभरा नोंदणी प्रक्रिया होत नाही. त्यामुळे नाविलाजाने शेतकऱ्याला आपला हरभरा कमी किमतीत व्यापाऱ्यांना विक्री करावा लागत आहे. पाटोदा तालुक्यात यंदा हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला होता. अनुकूल वातावरणामुळे पिकेही मोठ्या प्रमाणात आले. हरभऱ्या ला यंदा योग्य हमीभाव मिळण्याची शेतकऱ्यांमध्ये आशा आहे त्याच दृष्टीने पाटोदा तालुक्यात तीन ठिकाणी हरभरा खरेदी केंद्राच्या माध्यमातून नोंदणी ची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

पाटोदा तालुका खरेदी विक्री संघ , तालुका कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. कूसळब तसेच पारनेर या तीन ठिकाणी नोंदणी सुरु करण्यात आली यंदा हरभऱ्या साठी प्रती क्विंटल ५ हजार २३० रुपये हा हमीभाव निश्चित करण्यात आला तर हेक्टरी मर्यादा ९.५० क्विंटल एवढी आहे. हमीभाव जरी समाधानकारक असला तरीही शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याला प्रमुख कारण म्हणजे इ पिक पाहणी अॅप द्वारे पिक पेरा नोंद नसल्यामुळे तलाठ्यांकडून पिक पेरा प्रमाणपत्र देण्यात येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच अॅप द्वारे नोंदणी करावी लागत आहे.

ही नोंदणी प्रक्रिया ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मोठी अडचणीची ठरत असून १५ दिवसांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या खरेदी विक्री संघाच्या केंद्रावर आत्ता पर्यंत एकही शेतकऱ्याची नोंद नसल्याची माहिती समोर येत आहे तर कूसळब येथील केंद्रावर १६ फेब्रुवारी पासून सुरु करण्यात आलेल्या आत्ता पर्यंत केवळ ६२ शेतकऱ्यांच्या च नोंदी झाल्या आहेत . इ पिक पाहणी ऑप वर नोंदणी करण्यासाठी आम्हाला कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. त्यावरती पिकांची नोंद करणे बंधन कारक असल्याने तलाठी पिक पेरयाचे प्रमाणपत्र देत नाहीत, अशी अडचण शेतकरी श्रीधर सानप यांनी सांगितली.

पंधरा दिवसांपूर्वी पासून खरेदी विक्री संघा कडून हरभरा खरेदी साठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे मात्र इ पिक पाहणी अँप वर शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करावी लागत आहे. खरेदी विक्री संघाकडे अद्याप एकही नोंदनी झालेली नाही, अशी प्रतिक्रिया खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक सतीश जाधव यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...