आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:लाेंबकळणाऱ्या तारांची आज विद्युत निरीक्षक करणार पाहणी

विशेष प्रतिनिधी | गेवराई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार वर्षापूर्वी गेवराई तालुक्यातील खोपटी तांडा ग्रामपंचायतीने वीजेच्या लोंबळकणाऱ्या तारा दुरूस्तीसाठी ठराव घेतला.त्यांनतर दुरूस्तीची ऑर्डर निघुनही तारांची दुरूस्ती झाली नाही. रविवारी दुपारी साडेचार वाजता चारा आणण्यासाठी जाणारे पीकअप तारांना चिकटुन झालेल्या दुर्घटनेत एका शेतकऱ्याचा मृत्यू तर अन्य चार मजूर जखमी झाल्याची घटना घडली.दरम्यान घटनास्थळाची महाविरणच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी पाहणी करून विद्युत निरीक्षकांना अहवाल सादर केला असुन बुधवारी विद्युत निरीक्षक घटनास्थळी भेट देवुन पाहणी करणार आहेत. त्यानंतरच तारांची दुरूस्ती केली जाणार आहे.

गेवराई तालुक्यातील खोपटी तांडा येथील घटनास्थळाची महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पाहणी केली असून त्याबाबत विद्युत निरीक्षक यांना हा प्रकार कळवला आहे दरम्यान बुधवारी विद्युत निरीक्षक घटनास्थळी येऊन पाहणी करतील, त्यानंतर विद्युत तारा तुर्तास दुरुस्ती करण्यात येणार आहे.

शेतकऱ्याच्या कुटुंबासह जखमींना मिळणार मदत
खोपटी तांडा येथील शेतकरी आलू हरसिंग पवार यांचा सदरील घटनेत मृत्यू झाला असुन अन्य एक मजूर गंभीर होरपळला तर तीन जण जखमी झाले होते. स्थळ पाहणी अहवालानंतर मयत आलू हरसिंग पवार यांच्या कुटूंबासह घटनेतील अन्य जखमींना मदतीसाठी कार्यवाही केली जाईल. - अविनाश बयताड, पथक प्रमुख, महाविरण सिरसदेवी

हे प्रश्न अनुत्तरित
१ गेवराई तालुक्यातील शेत शिवारात विद्युत पोल वाकलेले असुन तारा लाेंबकळत असतांना सक्तीची वीज बील वसुली करणाऱ्या महाविरणला या तारा दिसत नाहीत का ?
२ खोपटी तांडा येथील ग्रामपंचायतीने तीन वर्षापूर्वी लाेंबकळणाऱ्या तारा दुरूस्त करण्यासाठी ठराव घेतला मग महाविरणने वीजेच्या तारांची दुरूस्ती का केली नाही ?
३ खोपटी तांडा येथे वीजेच्या तारा लाेंबकळत असतांना महाविरणच्या ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात हा भाग येतो त्यांनी तीन वर्षात काय केले ?

बातम्या आणखी आहेत...