आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंत्रणा:माजलगाव शहरातील सर्व्हे 380 तील अतिक्रमणे सिध्द झाल्याने हटवणार

माजलगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सर्व्हे क्रमांक ३८० या शासकीय जागेवर शहरातील अनेक धनदांडग्यानी बेकायदेशिररित्या केलेले अतिक्रमण सिध्द झाले आहे. आपआपले अतिक्रमण स्वतः ३० सप्टेंबरपर्यंत काढुन न घेतल्यास १ आॅक्टोबरपासून शासन स्तरावरुन ते पाडून सदरील खर्च अतिक्रमण धारकांकडून वसुल करण्यात येणार असल्याच्या नोटिसा एकुण ६६ अतिक्रमण धारकास तहसिलदार वर्षा मनाळे यांनी दिल्या आहेत. या नोटीसनंतर अतिक्रमण धारकात मोठी खळबळ माजली असून पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुभाष नाकलगावकर यांच्या सहा वर्षांपासूनच्या लढाईला मोठे यश मिळाले आहे.

माजलगाव शहरातील अत्यंत मोक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शासकीय सर्व्हे क्रमांक ३८० वर १९७० च्या दशकापासून लगतच्या सर्व्हे क्रमांकाच्या मालकीचा गैरफायदा घेऊन अनेक धनदांडग्यानी अतिक्रमण करत शासनाची करोडो रुपयांची जागा हडप केली. तेव्हा महसुल प्रशासनाने जाणिव पुर्वक दुर्लक्ष केले. या बाबत सदरील शासकीय जागा सार्वजनिक उपयोगासाठी यावे म्हणून माजलगाव येथील पत्रकारांनी वेळोवेळी वृतपञाच्या माध्यमातून आवाज उठवला. तरी ही सदरील अतिक्रमण निष्कसीत होत नसल्याने माजलगाव पञकार संघाने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी उपविभागिय कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. या उपोषणानंतर तत्कालीन उपविभागिय अधिकारी महेन्द्रकुमार कांबळे यांनी घेतली व या अतिक्रमणा बाबत कालबध्द कृती आरखडा राबवुन २०१५ ला झालेल्या एटीएस यंञाच्या साहाय्याने मोजणी करुन अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण नोंदवही असलेल्या १ ई मध्ये नोंदी करण्यात आल्या.

सदरील अतिक्रमणावर शिक्का मोर्तब झाला. सदरील अतिक्रमण निष्कसित करण्याची मागणी पत्रकार सुभाष नाकलगावकर यांनी शासनानाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला असतांना महसुल प्रशासन दुर्लक्ष करत होते. व्यथित होत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात जनहीत याचिकेद्वारे सदरील अतिक्रमण निष्कसित करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, न्यायालयाने अतिक्रमण धारकांची सुनावणी घेण्याचे आदेश महसुल प्रशासनास दिले. याच सुनावणी दरम्यान भुमिअभिलेख कार्यालयाकडून या प्रकरणात मिळत नसल्याच्या प्रतिसादामुळे तत्कालिन तहसिलदार वैशाली पाटील यांनी पुन्हा नव्याने मोजणी करण्याच्या दिलेल्या आदेशाने मोजणी केली. या मोजणीचा अहवाल लवकर न दिल्याने प्रकरणात निर्णय घेण्यात विलंब होऊ लागल्याने त्यांनी अतिक्रमणधारकाना अंशत: निर्णय देत त्यांचे आर्ज मंजुर केले. या निर्णयाविरोधात पञकार सुभाष नाकलगावकर यांनी पुन्हा नव्याने हायकोर्ट औरंगाबाद खंडपिठात धाव घेतली. याच याचिकेची कर्तव्यदक्ष तहसिलदार वर्षा मनाळे यांनी गंभिर दखल घेत ६६ अतिक्रमण धारकास नोटीस दिल्या आहेत. याप्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

असे होणार विविध कार्यक्रम
तहसिलदार पाटील यांच्या काळात मोजणी केलेल्या मोजणीची प्रक्रिया भुमिअभिलेख कार्यालयाकडून तहसीलदार मनाळे यांनी करुन घेतली व सदरील मोजणी नकाशात अतिक्रमण धारकाच्या क्षेत्रासह त्यांची नावे मोजणी नकाशात नमुद करुन अतिक्रमणे सिध्द झाल्यावर शिकामोर्तंब केला. याच अनुशंगाने त्यांनी एकुण ६६ अतिक्रमण धारकास नोटीस बजावून आपले अतिक्रमण शासकीय जागेवर केलेले असल्याने आपण ते ३० सप्टेंबरपर्यंत स्वाःताहून काढून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...