आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किर्तन सोहळा:साधू-संतांच्या भेटीमध्ये पाप, ताप व दैन्याचा समूळ नाश

बीड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात इतर लोकांच्या भेटीत प्रापंचिक हित किंवा अहिताच्या बाबी मिळतील. पण संत भेटीत मात्र दु:खमुक्तीच्या बाबीच मिळतात. म्हणजेच मानवी जीवनात साधू पुरुषाच्या भेटीत पाप, ताप, दैन्य याचा समूळ नाश होतो, असे प्रतिपादन रामकृष्ण रंधवे महाराज यांनी केले.

बीड येथे इंद्रप्रस्थ कॉलनीत आयोजित कीर्तनात ते बोलत होते. विठ्ठल-रुक्मिणी, हनुमान, संत तुकाराम महाराज, संत भगवान बाबा, संत वामनभाऊ महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या १० व्या वर्धापनदिनी ते बाेलत होते. ‘पाप, ताप, दैन्य जाय, उठाउठी झालिया भेटी हरिदासांची’ या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर त्यांनी निरूपण केले. रंधवे महाराज म्हणाले, साधू पुरुष हे जगाच्या कल्याणासाठीच अवतीर्ण झाले आहेत. ते जगाला कल्याणकारी उपदेश करतात म्हणून त्यांचा उपदेश मानवी जीवाने अवलंबला पाहिजे. त्यातून आपणास कल्याणापर्यंत जाता येते. या अभंगातून संतांचा शक्तीरूप महिमा सांगितला आहे. मानवी जीवनात पाप , ताप, दैन्य ह्या अनिष्ट बाबी आहेत. त्या जाव्यात असे प्रत्येकाला वाटते. त्यातून दु:ख मिळते. दु:खाला कारण पाप आहे, असेही त्यांनी सांगितले. या वेळी भाविकांची मोठी हजेरी होती.

बातम्या आणखी आहेत...