आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला पळवले:विभक्त राहणाऱ्या पत्नीला पिकअपमध्ये बसवून पळवले

गेवराई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कापुस वेचण्यासाठी गेलेल्या पत्नीस जावायाने बळजबरीने ओढत नेत पीकअपमध्ये बसुन नेल्याची तक्रार वडीलांनी गेवराई ठाण्यात दिली आहे तालुक्यातील मनुबाई जवळा येथील हरीभाऊ रख्माजी घोलप यांची मुलगी राधाबाईचा विवाह गावातील महादेव रामचंद्र ढाळे यांच्या सोबत २९ एप्रिल २००५ मध्ये झालेला असुन तीस आकाश व विकास अशी दोन मुले आहेत. पती महादेव हा पत्नी राधाबाईच्या चारित्र्यावर संशय घेत तिला सतत मारहाण करत होता. दरम्यान १० ऑगस्ट रोजी राधाबाईला घरातुन हाकलुन देत दोन्ही मुले स्वत: कडे ठेवले.

तेव्हापासून मुलगी राधाबाई वडीलांकडे राहत आहे. राधाबाईने पतीच्या विरोधात न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे. बुधवार २३ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता मुलगी राधाबाई व लहान मुलगी वंदना या दोघी दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर कापुस वेचण्यासाठी गेल्या होत्या. जावाई महादेव ढाळे याने येवुन शेत मालक अशोक सोनटक्के व गिता अशोक सोनटक्के यांना फोन करत राधाबाईला शेतात कामाला लावु नका नाहीतर मी तुमच्यावर पोलिसात केस करेल अशी धमकी दिली.

जावाई महादेव हा सोनटक्के यांच्या शेतात जावुन तुम्ही माझ्या पत्नीला शेतात कामाला का लावले. अशी विचारणा केली. मुलगी राधाबाई व वंदना याना शेतातून हुसकावले. मुलगी राधाबाई ही रस्त्यावर येताच तिला पीकअप एम.एच. २३ डब्लु ४०३८ मध्ये टाकुन घेवुन गेला. दरम्यान दुसरी मुलगी वंदना ही तिला सोडवण्याचा प्रयत्न करत जिवे मारण्याची धमकी दिली.

बातम्या आणखी आहेत...