आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२२६ दिवसाच्या यंदाच्या गाळप हंगामात लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्याने विक्रमी १० लाख ५३ हजार ७०० मेट्रीक टन उसाचे गाळप केले. कारखाना कर्मचाऱ्यांनीही अहोरात्र कष्ट करून हा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगत या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बक्षिस म्हणून देण्यात येणार असल्याची महत्वपुर्ण घोषणा चेअरमन धैर्यंशील सोळंके यांनी केली. यासह आगामी हंगामात कारखान्याने सुचित केल्याप्रमाणे ठराविक काळातच ऊस लागवड करावी, असे आवाहन धैर्यशील सोळंके यांनी केले.
तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके कारखान्याचा सन २०२१-२२ चा ३० वा गळीत हंगामाची सांगता शुक्रवारी (ता.१० जून) करण्यात आली. यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक भागवतराव देशमुख यांच्याहस्ते गव्हाणपूजन करण्यात आले. आमदार प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमास चेअरमन धैर्यशील सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक भागवतराव देशमुख हे होते. यावेळी व्यासपीठावर बाजार समितीचे सभापती संभाजी शेजूळ, माजी सभापती जयदत्त नरवडे व सर्व संचालक उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना धैर्यशील सोळंके म्हणाले की, आपल्या कारखान्याने या गळीत हंगामामध्ये ८,९३,७०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेऊन त्याबरोबरच को जन प्रकल्पाद्वारे ९,७६,९२,४०० युनिट विजेचे उत्पादन घेऊन आज अखेर ६,२८,३०,८०० युनिट वीज महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीस विक्री केली आहे. सदरचा प्रकल्प माहे जून अखेर कार्यरत ठेवणार असून याद्वारे एकुण १०.३६ कोटी युनिट विज उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामामध्ये आपल्या कारखान्याने ८,३२,२९१ क्विंटल साखरेची आज अखेर निर्यात केली असून पुढील काळात आणखी ४९०५० क्विंटल साखर निर्यात करण्याचे संचालक मंडळाचे धोरण असल्याचे त्यांनी नमुद केले. प्रास्ताविक जनरल मैनेजर (डिस्टीलरी व उपपदार्थ) डी. एम. वरे यांनी केले. यावेळी शेतकरी, सभासद हजर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.