आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील बेलगांव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोपाळ वस्तीवरील दादा माळी व त्यांच्या समवेत अनेक युवकांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृवावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही, असे प्रतिपादन याप्रसंगी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले.
गोपाळ वस्तीवरील आयोजित या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपिठावर दादा माळी, संजय पवार, राधेश्याम चक्कर, माऊली नवले, राम कदम, आमजत पठाण, गजानन काळे, गजू सोळंूखे यांची उपस्थिती होती. पुढेे बोलतांना माजी आमदार पंडीत म्हणाले, आपल्या गेवराई तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना हा डिसेंबर महिन्यापर्यंत २२ किमीपर्यंतचा ऊस बैलगाडीने उचलणार आहे. तसेच गाळप क्षमता देखील वाढवणार आहे. ज्या काही संस्था आमच्या ताब्यात आहेत ती कुणा एकाची जहागिरी नाही.
कारण यामध्ये काम करत असताना आम्ही कुठेही राजकीय वैर घेऊन काम करत नाही म्हणून ह्या संस्था चालतात. जनतेचा आजही आमच्यावर विश्वास असून कुठलीही सत्ता नसतांना आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले. यावेळी विजय माळी, रामदास माळी, सुभाष माळी, ज्ञानेश्वर माळी, रमेश माळी, हरीभाऊ माळी, गोरख माळी, दिलीप माळी, विश्वजित माळी, संभाजी माळी, बन्सी गव्हाणे हजर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.