आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:शेतकऱ्याने दिवसा विहिर खोदली, रात्री गावाकडे जाणारी महिला विहिरीत पडली; बीड तालुक्यातील घटना

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीड तालुक्यातील बेलगाव- लिंबागणेश रस्त्यावरील घटना

शेतालगत शेतकऱ्याने रस्त्यावर खोदलेल्या विहिरीत रात्रीच्या वेळी गावाकडे जाणारी महिला पडून जखमी झाल्याची घटना बीड तालुक्यातील बेलगाव-लिंबागणेश हद्दीत घडली. जखमी महिलेस पुढील उपचारासाठी बीडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी सदरील विहिरीचे काम बंद करत जागेची मोजणी केल्याशिवाय विहिरीचे खोदकाम करू दिले जाणार नसल्याचा पवित्रा घेतला.

बीड तालुक्यातील बेलगाव ते लिंबागणेश शिवरस्त्याला लगत शेतकरी शेषेराव भिमराव तुपे यांची जमीन असुन सोमवार १ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी शेतालगत रस्त्यावर पोकलेनने विहीरीचे खोदकाम सुरू केले, ग्रामस्थांनी रस्त्यावर विहीर खोदकाम करू नये अशी विनंती तुपे यांच्याकडे केली पंरतु तुपे यांनी याकडे लक्ष न देता विहीर खोदकाम सुरूच ठेवले. दिवसभरात दिड परस विहीर खोदली गेली होती. शेतकरी महिला सुदामती माणिकराव वायभट (वय ५०) ही पंढरपुरहुन लिंबागणेश येथील बसस्थानकावर आली त्यानंतर ती बेलगाव- लिंबागणेश रस्त्यावरून गणेशनगर येथे जात असतांना अंधारात निटसा रस्ता न दिसल्याने रात्री साडेआठ वाजता अचानक खोदलेल्या विहीरीत पडल्या. विहिरीत अचानक पडल्याने त्यांच्या कमरेला व पायाला मोठी दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बीड येथील खाजगी अस्थिरोगतज्ज्ञाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

शेतकरी व ग्रामस्थांचे दावे प्रतिदावे

बेलगाव ते लिंबागणेश शेत रस्त्या दरम्यान विहीर खोदकाम करणारे शेषेराव तुपे यांनी विहीरीचे खोदकाम माझ्याच शेतात असा दावा केला आहे. तर मागील ५० वर्षापासून रस्ता या ठिकाणीच आहे असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

मोजमाप केल्यांनतर होणार खोदकाम

शेतकरी शेषेराव तुपे यांच्या विहिरीच्या खोदकाम प्रकरणी पिंपरनई सरपंच बाळासाहेब वायभट, शिवसैनिक गणेश मोरे ,सामाजीक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी एकत्र येत तोडगा काढला असुन मोजमाप करण्यात आल्यानंतरच पुढील खोदकाम करण्यात यावे अशी भूमिका घेतली. दोन्ही बाजुंच्या मंडळींना विश्वासात घेऊन हा प्रश्न निकाली काढला आहे. यावेळी आक्रमक ग्रामस्थांनी तातडीने विहीर बुजवावी अशी मागणी केली तेव्हा शेतकऱ्याने माझा झालेला खर्च कोण देणार असा सवाल केला. शेवटी मोजमाप केल्यांनतर फैसला होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...