आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील शेतकरी पुत्र शंकर लक्ष्मण उकांडे यांची राज्य आपत्ती प्रतिसाद दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल पिंपळवंडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अंमळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय गोरक्ष पालवे, जि.प. सदस्य माऊली जरांगे, ज्ञानेश्वर पवार, उपसरपंच दादासाहेब पवार, माजी उपसभापती दादासाहेब धनवडे, शिवसेना तालुका उपप्रमुख अशोक पवार उपस्थित होते.
शंकर उकांडे हे २००५ मध्ये एस.आर.पी.एफ मध्ये दौंड येथे भरती झाले होते.याच ठिकाणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर ते कार्यरत होते. २०१६ पासून राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्र दौंड येथे प्रशिक्षक म्हणून त्यांनी प्रशिक्षण देण्याचे काम केले. पिंपळवंडी सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी पुत्राने पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत भरारी घेतली.याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावकऱ्यांच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ.रेवण पवार, रामनाथ भणगे, बिभिषण पवार, नागेश शहाणे, दादासाहेब पवार, बाबासाहेब जाधव, बबनराव उकांडे, चंद्रकांत पवार, भाऊसाहेब पवार, नानासाहेब डीडूळ, कल्याण पवार, उध्दव पवार, चंद्रकांत उकांडे, बाळू जरे, नारायण महाराज बजगुडे, जालिंदर राऊत, जानूद्दिन शेख, नरहरी वाघमारे, बाबासाहेब राऊत, देविदास पवार, तेजस काळे, सचिन वारे, अमोल पोकळे, बाप्पू पवार, संतोष कांबळे, प्रभाकर धनवडे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.