आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीड शहरापासून १२ किमी अंतरावर असलेल्या पाली येथील डोंगरावर सोमवारी आग लागली. याच्या शेजारीच एचआयव्हीबाधित मुलांसाठीची आनंदनवन इन्फंट इंडिया संस्था आहे. आगीने संपूर्ण परिसर कवेत घेतल्यानंतर संस्थेतील मुलांनी आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न केले. अग्निशमन दलाचे बंब पोहोचण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी लागला. तोपर्यंत या संस्थचे संचालक संचालक दत्ता व संध्या बारगजे यांच्यासह मुलांनी कळशी, बकेट घेऊन आग पसरण्यापासून रोखली. आगीचे नेमके कारण माहिती नसल्याचे बारगजे म्हणाले.
पंधरा मिनिटांत पोहोचले अग्निशमनचे पथक
साेमवारी दुपारी १ वाजता फाेन अाला. बंब १५ मिनिटांनी पोहोचले. अाग विझविण्यासाठी अडीच तास लागले. विष्णू कानताेडे, भागवत धायतडक, गाेरख ढाेकणे, प्रभाकर मस्के यांनी अाग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
८०० फुटांपर्यंत डोंगरक्षेत्राचा परिसर आग पसरण्यापासून रोखला
६५ मुलांनी ४० कळश्या व बकेट घेऊन आग विझविण्याचा केला प्रयत्न
७५ मुले-मुली इन्फंट इंडिया संस्थेत वास्तव्यास
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.