आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश‎:गेवराई नगरपालिका कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन‎ आयोगाचा प्रथम व दुसरा हप्ता 4 दिवसांत देणार‎; जिल्हाध्यक्ष लाड यांच्या‎ मागणीला यश‎

गेवराई‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई नगर परिषदेतील‎ कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन‎ आयोगातील फरकाचा पहिला व‎ दुसरा हप्ता तात्काळ कर्मचाऱ्यांच्या‎ खात्यावर जमा करावा, अशी‎ मागणी कर्मचारी संघटनेचे‎ जिल्हाध्यक्ष एकनाथ लाड यांनी‎ मुख्याधिकारी भोसले यांच्याकडे‎ केली होती. त्यानुसार येत्या चार ते‎ पाच दिवसात सर्व कर्मचाऱ्यांच्या‎ खात्यावर पेमेंट जमा केले जाईल‎ अशी ग्वाही मुख्याधिकारी भोसले‎ यांनी दिली आहे.‎ गेवराई नगर परिषद मधील‎ कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन‎ आयोगातील फरकाचे थकित‎ पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची‎ पेमेंट कर्मचाऱ्यांना अद्याप मिळाले‎ नाही.

याबाबत नगर परिषद कर्मचारी‎ संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ लाड‎ यांच्यासह सर्व कर्मचारी यांनी‎ वेळोवेळी निवेदन देऊन,‎ प्रशासनाकडे याबाबत मागणी केली‎ होती. शासनाकडून निधी आल्यास‎ कर्मचाऱ्यांना दोन्ही हफ्ते दिले‎ जातील असे आश्वासन वेळोवेळी‎ मुख्याधिकारी यांच्याकडून मिळत‎ होते. १४ जून २०२२ रोजी याबाबत‎ शासनाने अध्यादेश काढून,‎ राज्यातील तमाम कर्मचाऱ्यांच्या‎ सातव्या वेतन आयोगाचे फरक‎ बिलासाठी निधी उपलब्ध करून‎ दिला आहे.

या पार्श्वभूमीवर‎ न.प.कर्मचारी संघटनेचे बीड‎ जिल्हाध्यक्ष एकनाथ लाड यांनी १६‎ जून रोजी नगर परिषद मुख्याधिकारी‎ भोसले यांची भेट घेऊन याबाबत‎ विचारणा करत संबंधित‎ कर्मचाऱ्यांना दोन्ही हफ्त्याचे पेमेंट‎ देण्याबाबत विनंती केली होती. याला‎ प्रतिसाद देऊन येत्या चार ते पाच‎ दिवसात सर्व गेवराई नगर‎ परिषदेतील सेवानिवृत्त‎ कर्मचाऱ्यांसह सध्या सेवेत‎ असलेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर‎ पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे‎ थकित पेमेंट जमा करण्यात येईल,‎ अशी ग्वाही मुख्याधिकारी भोसले‎ यांनी दिली आहे. या निर्णयमुळे‎ गेवराई नगर पालिकेच्या‎ कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त‎ करण्यात येत आहे

बातम्या आणखी आहेत...