आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्युषण:‘मतभेदाचा कचरा आपल्या अंत:करणातील दिव्य दृष्टीने साफ झाला व्हायला हवा’

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मतभेदाचा कचरा आपल्या अंत:करणातून दूर झाला पाहिजे. त्यासाठी आत्म दिव्य दृष्टी उपयुक्त ठरते. अंत:करणाच्या भिंतीवर एक गोष्ट रेखांकित करायलाच हवी की, वैरत्वाने वैरत्वाला पूर्णविराम मिळत नसतो. तर दुसऱ्याच्या चुकाला क्षमा करण्यात पुरुषार्थ असतो, असे प्रतिपादन साध्वी किरणसुधाजी यांनी केले.

बीड येथे पर्युषण पर्वानिमित्त आयोजित प्रवचनमालेत त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, कपडा रुपी वस्त्र फाटले तर त्याला शिवले जाते. लाकडाच्या तुकड्याला फेविकॉलने जोडले जाते. मात्र काळजाच्या तुकड्यावर वर्मी घाव बसला तर महत्प्रयासाने त्याला क्षमायाचनेतून जोडावे लागते. अशी क्षमाही अंत:करणाची क्षमा याचनेतून दौलत असते. प्रगतीची पायघडी असते. सत्वाची सरिता ठरते. क्षमापना ही भूतकालीन गुणोत्तराची परीक्षा असते, निर्दोष जीवन जगण्याची मर्यादा कठीण असते. क्षमा मोक्षाचा प्रवेश. क्षमाही कर्माची कर्करोगावरील शस्त्रक्रिया, क्षमा सवयीमध्ये पाहिजे. क्षमेची सवय असायला हवी. क्षमा प्रेमाचे वस्त्र आहे, विश्वासाचे वचन आहे, सज्जनाचा सन्मान आहे, असेही साध्वी किरणसुधाजी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...