आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय शिक्षण प्रसारक संस्था ही शिक्षकांच्या सेवाकार्याचा आदरपूर्वक गौरव करणारी संस्था आहे आणि ही उज्ज्वल परंपरा संस्थेने आजतागायत जपलेली आहे. सेवापूर्तीचा गौरव हा सेवाकाळातील परिश्रमाची पावती असल्याचे प्रतिपादन खोलेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी यांनी केले. अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयाच्या व्यवसाय शिक्षण विभागाचे उपप्राचार्य तथा हॉर्टिकल्चर विभागातील शिक्षक प्रा.अजय मधुकरराव चौधरी यांच्या सेवागौरव समारंभात ते अध्यक्षीय समारोपात बोलत होते. याप्रसंगी मंचावर सत्कार मूर्ती प्रा.अजय चौधरी, शैला चौधरी, संस्थेतील माजी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे या मान्यवरांची उपस्थिती होती. उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब मुंडे म्हणाले की, प्रा.चौधरी यांनी महाविद्यालयात अत्यंत निष्ठेने कार्य केले.
सर्व सहकाऱ्यांसह त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अध्यापन क्षेत्रात कार्यरत असताना एका सचोटीने काम करावे लागते. ही सचोटी जपली तरच केलेल्या श्रमाचा आनंद होतो. विद्यार्थी आपल्या हातून घडणे ही एक उच्च दर्जाची प्रतिभा आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनिता बर्दापूरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.बिभिषण फड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, माजी कर्मचारी, हाॅर्टिकल्चर विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.चौधरी यांनी मनोगत व्यक्त करत सेवाळाकातील अनुभव मांडले. शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
ज्ञानदानाच्या कार्यातून शिक्षण संस्कार नव्या पिढीकडे जातात
सेवा करत असताना आपल्याला कुठली संधी मिळाली हे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे. अध्यापन क्षेत्रात कार्यरत असताना आपल्या हातून पवित्र असे ज्ञानदानाचे कार्य घडत असते. ज्ञानदानाच्या माध्यमातून एक विचार, एक संस्कार आपण नव्या पिढीला देत आहोत. हेच खरे आपल्या कार्याचे चीज आहे. आपण दिलेले संस्कार व ज्ञान घेऊन ही नवी पिढी देशाचे भवितव्य घडवण्यासाठी योगदान देत असते. त्यामुळे अध्यापन कार्यात मिळालेली संधी सर्वांनी मोलाची आहे हे स्मरणात ठेवावे, असे प्रभारी प्राचार्य देवर्षी यांनी याप्रसंगी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.