आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगात इतरांचा महिमा सांगता येतो तो सर्वगुणसंपन्न नसतो. इतर निर्भर होऊ शकत नाहीत. त्यात परम कल्याण नाही पण संत संगतीत मात्र तुका म्हणे त्यांच्या भेटी- होय संसाराची तुटी-मनुष्य निर्भय होतो परम कल्याण होते. त्यांचा महिमा वर्णन करण्यास वाणी अपूरी पडते म्हणजेच संतांचा महिमा हा अवर्णनीय आहे असे प्रतिपादन बाळू महाराज गिरगावकर यांनी श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे कीर्तन प्रसंगी केले.
बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे सदगुरु श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या २२ व्या पुण्यस्मरणानिमित्त तपोनिधी शांतिब्रम्ह गुरुवर्य महादेव महाराज श्रीक्षेत्र चाकरवाडी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील ५ वे कीर्तन पुष्प गुंफताना काय वाणूं आता न पूरे ही वाणी - मस्तक चरणी ठेवितसे. या संत तुकाराम महाराज यांच्या ५ चरणी अभंगातून बाळू महाराज गिरगावकर हे संतांचा महिमा वर्णन करण्यास वाणी अपूरी पडते हे सांगतात.
बाळू गिरगावकर म्हणाले की, मृत्यूलोकात सर्वच मोक्षाची इच्छा करतात पण संतांनी मोक्षाला कामाला लावले नव्हे नव्हे त्याला लाथाळलेसुद्धा. संताचे नाव काढल्यावर यमालासुद्धा थरकाप सुटतो. जगाला काळ खातो पण संत हे त्यांच्या माथ्यावर लाथ मारतात.संताचा अधिकार फार मोठा आहे पहाणा चाकरवाडी येथे अण्णपूर्णा देवीचे अधिष्ठान आहे.नामाचे, भक्तीचे अधिष्ठान आहे. मूर्तीमंत भक्तीचे अधिष्ठान पाहायाचे असल तर येथील भक्ती समुदाय पाहावा. संत पद हे कितीही पैसे दिले तरी मिळत नसते त्यासाठी अंगी संत व्हावे लागले.
ब्रम्हांडाच्या मालकांचे भक्त हे काहीही करू शकतात. अन्नपूर्णाछत्र चालविण्यासाठी ब्रम्हांडाचा मालक इथे भक्तांच्या रूपाने नांदतो आहे. संत नामदेवास पांडुरंग मूर्ती थरकापत होती. बंकटस्वामींच्या अनुपस्थितीत भक्तासाठी देवाला स्वामी होऊन काकडा करावा लागला. संत माऊलींना अवघाचि संसार सुखाचा करीन ही जगाच्या कल्याणासाठी प्रतिज्ञा करावी लागली. ते पुढे म्हणाले की, तुकाराम महाराज म्हणतात की माझी वाणी अपुरी पडली म्हणून मी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवतो.संत हे सज्जन व दुर्जन या दोघांचाही उद्धार करतात.देह हा देवाकरिता व परोपकाराकरिता कारणी लावतात. दया हे त्यांचे भांडवल आहे.त्यांचे बोलणे अम्रृतासारखे मधूर व वाणीतून हरिच्या नामाचा ओघ असतो.जगाचे कल्याणासाठी त्यांचा अवतार आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी गायक म्हणून बिबीषण कोकाटे, हरि किसन देवकर,संजय देवकर, हरिभाऊ काळे, अभिमान ढाकणे,ओंकार जगताप, सोपान काका राऊत परभणी, शिवानंद गिरी,रवि पूरी,बंकटकुमार बैरागी, शिरीष धर्मापूरी, कापसे माजलगाव,राहूल जाधव, व मृदंग वादक तालमहर्षी राम महाराज काजळे , तुकाराम आव्हाड, दत्तात्रय पूरी, प्रमोद पदमुले आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.