आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्रीरामांचा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी आणि वाजत-गाजत मिरवणूक काढून अयोध्यानगरातील रहिवाशांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या हस्ते लोक वर्गणीतून उभारलेल्या श्रीराम मंदिराचे थाटात कळसारोहण केले. लेकीच्या हाताने मंदिरावर कळस बसवण्याची गेल्या अनेक दिवसांपासूनची इच्छा रहिवाशांनी यानिमित्ताने पूर्ण केली. दरम्यान, मंदिरासाठी भव्य आणि सुसज्ज सभागृह बांधून देण्याचा शब्द पंकजा यांनी यावेळी भाविकांना दिला. जलालपूर परिसरातील अयोध्यानगरात रहिवाशांनी लोकवर्गणीतून श्रीराम मंदिराची उभारणी केली आहे.
मंदिराचा कळसारोहण सोहळा पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठया उत्साहात आणि थाटात पार पडला. सकाळी पंकजा यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर नागरिकांनी मंदिराचा कळस त्यांच्याकडे सुपूर्द केला त्यांनी तो कळस डोक्यावर घेऊन त्याची वाजत-गाजत मिरवणूक काढली. जागोजागी रांगोळ्या, गुढ्या उभारून भाविकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. श्रीरामाचा जयघोष करत महिला व पुरुष भाविक यात सहभागी झाले. मंदिरात राम, लक्ष्मण व सीता यांच्या मुर्त्या स्थापन करण्यात आल्या आहेत. एक आदर्श पती, आदर्श पत्नी व आदर्श भाऊ कसे असावेत याचे ते प्रतिक आहेत.
या तीन गोष्टी असतील तर समाजाचं पतन होणार नाही. देवी सीता हे स्त्रीच्या सन्मानाचं उदाहरण आहे. स्त्रीकडे वाईट नजरेनं पाडणाऱ्यांचा सर्वनाश होतो हे रामायणाने शिकवलं, त्यामुळे स्त्री शक्तीचा सन्मान राखा असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. हे मंदिर सर्वांना सकारात्मक उर्जा देईल. मंदिरासाठी सभागृह बांधून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे, रमेश कराड, श्रीराम मुंडे, सरपंच गोवर्धन कांदे, ज्ञानोबा मुंडे गुरूजी, प्रसाद कराड, मारोती ढाकणे, भगवान भांड, त्रिंबक गिते, माणिक कोरडे, बालासाहेब मुंडे, सोपान गिते आदी उपस्थित होते.
वेदमंत्रांच्या घोषात, विधिवत पूजन वेदमंत्रांच्या घोषात, विधिवत पूजन करून पंकजाताईंच्या हस्ते मंदिरावर कळस बसवण्यात आला. मंदिरात सुंदर व आकर्षक स्थापित करण्यात आलेल्या प्रभू श्रीराम, लक्ष्मण व देवी सीतेच्या मूर्तीचे त्यांनी दर्शन घेतले. भाविकांच्या वतीने त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.