आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मुख्य कार्यालयासमोर २४ डिसेंबरपासून प्रकल्पग्रस्त बेमुदत उपोषणाला बसले आहेत. नवव्या दिवशी ही उपोषण सुरुच होते. औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या प्रकल्पग्रस्तांना कायम सेवेत सामावून घ्यावे, ४५ वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पग्रस्तांचा निर्वाह भत्ता ३० हजार रुपये करावा, चंद्रपूर पाॅवर स्टेशन येथे प्रकल्पग्रस्तांचे दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे.
प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसून नऊ दिवस उलटून गेले आहेत आणि उपोणार्थींपैकी तिघांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित यंत्रणेपैकी कुणीही उपोषणार्थी ची भेट घेतली नाही. दोन दिवसात मागण्या मार्गी लागल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सुधीर फड यांनी सांगितले.
काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख व अॅड. माधव जाधव, मनसेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष रवि राज नेमाने, ऋषिकेश बारगजे, विठ्ठलराव झिलमवाड यांनी भेट देऊन उपोषणार्थ्यांची चर्चा केली आहे. महा निर्मितीच्या कंपनी अधिकाऱ्यांकडून उपोषण मागे घ्यावे यासाठी दबाव आणण्यात येत असल्याचा आरोप उपोषणार्थ्यानी केला आहे,
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.