आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:सोनीजवळा ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण घेतले मागे ; महावितरण अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील सोनीजवळा येथील बंद असलेला शेतीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा व शेतातील खाली लोंबकाळत असलेल्या विद्युत तारा व वाकलेले विद्युत खांबाची दुरुस्ती करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सोनीजवळा येथील ग्रामस्थांनी केज येथील महावितरण कार्यालयासमोर गुरुवारी अमरण उपोषण सुरू केले होते. मात्र अभियंत्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

केज तालुक्यातील सोनीजवळा येथील शेतीला विद्युत पुरवठा करणारा केज येथील ३३ केव्हीं उपकेंद्रातील दहा केव्हीचा ट्रान्सफॉर्मर गेल्या दोन महिन्यांपूर्वी जळाल्याने विद्युत पुरवठा खंडित होता. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी सातत्याने करूनही दिवसभरात अर्धा तास वीजपुरवठा केला जात असल्याने पाण्याअभावी पिके करपून चालली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या मुकुंद गायकवाड, अरुण करपे, दादासाहेब ससाणे, शंकर पाखरे, अविनाश ससाणे, बाळासाहेब कोकाटे, मिनाज पठाण, गोविंद ससाणे यांच्यासह शेतकऱ्यांनी गुरुवारी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

यावेळी तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून मध्यस्थी केली. त्यांनतर आंबेकर यांनी आंदोलक शेतकऱ्याची भेट घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर गावकऱ्यांनी महावितरण विरोधात उपोषण मागे घेतले.

बातम्या आणखी आहेत...